जालना जिल्हा
वादळी वाऱ्याने सोलरचे नुकसान, सोलर कँपनीचे दुर्लक्ष

जांब समर्थ प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ महसूल मंडळात दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यात जांब समर्थ येथील रहिवासी व अल्प भूधारक शेतकरी आसाराम यशवंत देवकर गट नंबर 356 यांच्या शेतातील सोलर वॉटर पंप हा जमीनदोस्त झाला. काही दिवसांपुर्वी बसवलेला या सोलर वॉटर पंप ला वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसला आहे यात शेतकऱ्याचेही भरपूर नुकसान झाले आहे याची भरपाई करून मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे परंतु वारंवार एल अँड टी कंपनी कडे तक्रार करून देखील या बाबतीत काहीच पाऊल उचलले गेले नाही.