कुंभार पिंपळगावात मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार (ता.आठ) मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.ना.अब्दुल सत्तार यांनी अशोभनीय असे वक्तव्य केले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.पदाधिकारी यांच्याकडून ना.सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस नाईक रामदास केंद्रे यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनावर रविंद्र आर्दड, भागवत सोळंके, अजीमखान पठाण, दत्तात्रय कंटुले,मनोज गाढे, अनवर पठाण, अंकुश रोकडे,दिलीपराव राउत,रफिक कुरेशी, नाजेम पठाण, विजय कंटुले,धनंजय कंटुले, रहिम पठाण, यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.