घनसावंगी तालुका

घनसावंगी बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजला: प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

न्यूज जालना / विशेष प्रतिनिधी

images (60)
images (60)

: फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका अखेर जाहीर झाल्या. त्यानुसार मतदारांच्या प्रारूप मतदार यांद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी तयारीला लागली आहे. तर शिवसेना, भाजप हे पक्षही वर्चस्वासाठी कामाला लागले आहे. यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

निवडणूकीच्या अनुषंगाने सोसायटी मतदार, ग्रामपंचायत मतदार, व्यापारी मतदार, तसेच हमाल मापाडी मतदारांच्या प्रारूप मतदार याद्या गुरुवारी प्रसिद्ध झाल्या. अंतिम मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजेश टोपे यांचे अनेक वर्षापासून वर्चस्व आहे. निवडणुकीचा बिगुल वाजताच बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी आमदार राजेश टोपे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट व भाजप यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. प्रारूप मतदार यादीवर येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येतील. २ डिसेंबरपर्यंत सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.


संचालक मंडळ निवडीसाठी जानेवारी अखेर निवडणूक

घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ११७ गावात मिळून एकूण १ हजार ९९२ मतदार संख्या आहेत. यात विविध कार्यकारी सोसायटी मतदार संख्या ५७६, ग्रामपंचायत मतदार संख्या ८४६, व्यापारी मतदार संख्या ३०२, तर हमाल मापाडी मतदार संख्या २६८ आहे. बाजार समितीच्या संचालकाच्या अठरा जागांसाठी निवडणूक संपन्न होणार आहे. यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी या मतदार संघातून ११ संचालकाची निवड, ग्रामपंचायत मतदार संघातून चार संचालकांची निवड, व्यापारी मतदारसंघातुन दोन ,हमाल मापाडी मतदारसंघातून एक अशा १८ संचालकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जानेवारी अखेर होण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या निवडणूकीत शिवसेना ही मागील निवडणूकित एकटी प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहिली होती. यावर्षीही शिवसेना हे समविचारी पक्षासोबत ही निवडणूक लढविणार आहे.

उध्दव मरकड, तालुकाध्यक्ष शिवसेना (ठाकरे गट)

बाजार समितीची निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे. युती बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निवडणूक लढण्याची तयारी तयारी सुरू केली आहे.

शिवाजी बोबडे, तालुकाध्यक्ष भाजप

बाजार समितीवर राष्ट्रवादीचे मागील अनेक वर्षापासून वर्चस्व राहिलेल आहे. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी आपले सर्व उमेदवार निवडून आणून परत राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वास आहे.

नंदकुमार देशमुख, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!