घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घाणेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

कुलदीप पवार/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव-कोठाळा परीसरात असलेल्या नागेश्वर मंदिर संस्थानात दि.२२ नोव्हेंबर पासून अखंड हरीनाम सप्ताह संगीत भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होत आहे.
या सप्ताहात ह.भ.प.स्वामी अमोलानंदजी महाराज, ह.भ.प.सुरेशानंद महाराज शृंगीगड, ह.भ.प.शामसुंदर गिरीजी महाराज, ह.भ.प.आत्मानंद महाराज शास्त्री, ह.भ.प.शिवानंद महाराज उक्कडगावकर,ह.भ.प.गोपाल गिरीजी महाराज यांचे किर्तन होणार आहे.तर कृष्ण महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक महंत प्रेमानंदजी महाराज व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.