घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेचे पोलीस अधीक्षक याना निवेदन
जालना /प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी भागातील अवैध धंदे बंद करण्यात यावे नसता शिवसेनेकडून (ठाकरे गट)आंदोलन छेडण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख हिकमत उढाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे यांना दिले आहे यावेळी घनसावंगी तालुका अध्यक्ष उद्धव मरकड यांची उपस्थिती होती
निवेदनात म्हटले आहे की,
मागील अनेक दिवसापासुन तिर्थपुरी परीसरामध्ये काही महिन्यापासून अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढत असल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ए.पी.आय. दिपक लंके यांच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांचा नुसता उच्छाद मांडला आहे. तिर्थपुरी परीसरातील तसेच गोदा काठ परीसरातील अवैध वाळू उपसा विना परवानगीने कुठलेही गौण खनिज परवानगी नसताना सर्रासपणे उपसा सुरु आहे.
तिर्थपुरी परीसरातील छोटया मोठया पानटपरी वर अवैध प्रमाणात सर्रास गुटखा पान मसाला विनापरवानगीने अवैध विक्री होत आहे. धाब्यावरील विनापरवानगीने अवैध रित्या मद्यपान विक्री मादक सेवन विक्री राज रोसपणे उघडपणे कुणाच्या आशिवार्दाने होत आहे याची आपल्या स्तरावरुन चौकशी करण्यात यावी
शैक्षणिक संकुलाच्या परीसरात मोठया प्रमाणात अवैध धंदे ए.पी.आय. दिपक लंके यांच्या आशिवादाने सुरु आहेत या मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व विद्यार्थ्यांना व्यसनाधिनतेकडे खेचण्याचा भयानक प्रकार वाढत चालला आहे. या मुळे विद्यार्थ्यांच्या करीअर वर आघात होत आहे. माननिय महोदयांनी या प्रकरणाची दखल घेण्यात यावी व सदरील ए.पी.आय. दिपक लंके यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी जर यांच्यावर कायदेशिर कार्यवाही झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने तिव्र प्रकारे आंदोलन छेडण्यात येईल व आपणास विनंती आहे की या वाढत चाललेल्या अवैध धंद्याची गांभिर्याने दखल घ्यावी. असे ही निवेदनात नमूद आहे