जालना क्राईम

मतिमंद महिलेवर नराधमांचा अत्याचार; जालन्यात दोन दिवसात तीन बलात्कार

भाजपा नेत्या चित्रा वाघ घेणार पीडित महिलांची भेट

images (60)
images (60)

जालना : जालना जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील दोन दिवसात तब्बल तीन बलात्काराचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे भोकरदन तालुक्यात यापैकी दोन घटना घडल्या आहेत. तर तीसरी घटना ही घनसावंगी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यामध्ये तीन गुन्हे अवघ्या दोन दिवसात नोंद करण्यात आल्याने जालना जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


घनसावंगी तालुक्यातील मूर्ती फाटा येथे एका गतिमंद महिलेवर गावातील एका व्यक्तीने अत्याचार केल्याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात भादवि कलम 376 आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास घनसावंगी पोलीस करीत आहेत. तर भोकरदन तालुक्यातील वडोद बाजार येथे दिरानेच आपल्या भावजयीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाय भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे एका महिलेवर अत्याचार करून महिलेच्या ऑडिओ क्लिप तिच्या पतीला पाठवल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केली.

त्यानंतर या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसात जालना जिल्ह्यात तीन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्याने येथील महिला सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ देणार भेट जालना जिल्ह्यात अवघ्या दोन दिवसात तीन बलात्काराचे गुन्हे नोंद झाल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ जालन्यातील पीड़ित मालिकांना भेट देण्यासाठी येणार आहेत अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली. शिवाय पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची देखील भेट घेऊन या प्रकरणातील कारवाईबाबत माहिती घेणार असल्याचं समोर येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!