जालना क्राईमपरतूर तालुका

ब्रेकिंग :- जालना जिल्हात विक्रीसाठी येणारा अवैध गुटखा साठा जप्त

जालना प्रतिनिधी:

images (60)
images (60)

दिनांक 28/11/2022 रोजी स. पो. नि. योगेश धोंडे यांना गुप्त बातमी मिळाली की, एका पांढ-या रंगाच्या टाटा इन्ट्रा वाहन क्रंमाक MH-21- BH-3475 लोडींग वाहनामध्ये एक इसम महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला जर्दा अवैधरीत्या स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी माजलगावकडुन परतुरकडे चोरटी विक्री / वितरण करण्यासाठी घेवुन जाणार आहे. अशा मिळालेल्या बातमीवरुन मा. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश धोंडे व स्टॉफ व पंच असे आष्टी गावात सापळा लावुन थांबलो असता सदरचे वाहन हे आष्टी गावाकडुन परतुर रोड कडे जातांना परतवाडी तांडा जवळ हॉटेल कार्तिक समोर वाहन पाठलाग करुन थांबविले.

सदर वाहनामध्ये चालक व मालक असल्याचे दिसुन आले त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता चालक 1) शेख आमेर शेख निजाम वय:- 26 वर्षे धंदा ड्रायव्हर राहणार खतीब मोहल्ला अंबा रोड परतुर ता. परतुर जिल्हा जालना व मालक 2) मुजाहिद उर्फ मुज्जु गुलाब खान वय:- 35 वर्षे धंदा व्यापार राहणार कायमखानी गल्ली परतुर ता. परतुर जिल्हा जालना असे सांगितले त्यांच्या ताब्यातील वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता MH-21- BH-3475 लोडींग वाहनामध्ये 11,66,800 /- रुपये किमतीचा राजनिवास सुगंधीत पान मसाला व जाफराणी जर्दा असा महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला मिळुन आल्याने सपोनि योगेश धोंडे यांनी पंचासमक्ष 11,66,800/- रुपये किमतीचा गुटखा व 8,00,000/- रुपये किंमतीचे वाहन असा एकुण 19,66,800/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन वरील नमुद दोन इसम यांना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी पोलिस स्टेशन आष्टी येथे हजर करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश धोंडे पोलिस अंमलदार अंबादास साबळे, गजु भोसले, लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे सह चालक सुभाष गावडे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!