घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील उमेदवार सरपंचपदासाठी, तर टोपे – उढाण लढणार वर्चस्वासाठी

न्यूज जालना

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील मुदत संपलेल्या ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात ज्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे, त्या ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. घनसावंगी तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रतिस्पर्धी राहत आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राजेश टोपे यांनी गावनिहाय आढावा घेऊन, तर डॉ. हिकमत उढाण यांनी मेळाव्यातून आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजयासाठी मार्गदर्शन केले आहे.

३४ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी आमदार राजेश टोपे यांनी दोन वेळा घनसावंगीत ग्रामपंचायतनिहाय बैठका घेऊन एकच पॅनेल होण्यासाठी प्रयत्न केला आहे.

शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण यांनी शिवसेनेचा मेळावा घेऊन आहे. मोर्चेबांधणी केली आहे. माजी आमदार विलास खरात यांनी भाजपला गावागावांत सक्षम करण्यासाठी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांनी अनेक ग्रामपंचायतींत पॅनल उभे केले आहे

याबरोबरच तालुक्यातील वंचितआघाडी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माणनिवडणुकीमध्ये काय भूमिका घेतेयाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान,सरपंचाची निवड जनतेतून होणारअसल्याने उमेदवारांची संख्यावाढल्याने पक्षश्रेष्ठींची डोके दुखी वाढली आहे. यात एखाद्या उमेदवारनाराज झाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३४ ग्रामपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीची ताकद

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींत भादली. बाणेगाव, दहीगव्हाण बुद्रुक, तळेगाव, मानेपुरी, कुंभार पिंपळगाव, पिरॉबवाडी, हातडी, बोलेगाव, उक्कडगाव, राणीउंचेगाव, कोवळा बुदुक, दैठणा बुद्रुक, दैठणा खुर्द, गाढेसावरगाव, मूर्ती, आरगडेगव्हाण, सिद्धेश्वर पिंपळगाव, शिवनगाव, भोगगाव, शेवता, चापडगाव, लिंबी, वडीरामसगाव, घाणेगाव, डाहाळेगाव, मोहपुरी, अंतरवाली राठी, भेंडाळा, येत विरेगव्हाण, पांगरा, मंगूजळगाव, श्रीपत धामणगाव या गावांचा समावेश आहे. गत विधानसभा निवडणुकीत यातील १५ गावांत राष्ट्रवादी तर १९ गावात शिवसेना वरचढ ठरली होती, त्यामुळे या गावातील निवडणुका अटीतटीच्या आणि तेवढ्याच चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!