एड्स दिननिमित्त कुंभार पिंपळगाव येथे जनजागृती रॅली संपन्न
एड्स दिननिमित्त कुंभार पिंपळगाव येथे जनजागृती रॅली संपन्न
जालना : प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत आज दिनांक 1 डिसेंबर रोजी प्रशालेच्या विज्ञान विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिननिमित्त गावातून जनजागृती रॅली काढून उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांच्या नेतृत्वाखाली गावातील मारोती मंदिर प्रंगणामधे विद्यार्थी,शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी,ग्रामस्थ यांना एड्स नियंत्रण व जनजागृती ची शपथ मुख्याध्यापकांनी यांनी यावेळी दिली.
दरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनी नी एड्स विषयक माहिती देणाऱ्या घोषणा दिल्या तसेच माहिती देणारे फलक घेऊन आपला सहभाग नोंदवला.या नंतर प्रशालेत एड्स विषयक माहिती व सावधानता बाळगणे विषयक भित्तीपत्रके,माहिती फलक यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सदर्भित रॅली ही बस स्टँड रोड,लते अंबड चौफुली मार्गे सरस्वती भुवन प्रशालेत अशी काढण्यात आली होती.
त्या नंतर शासकीय दवाखान्यातील आरोग्य विभागाचे तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. पवन दाड यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना एड्स रोगविषयी बाळगावव्याच्या सावधानता या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक . मधुकर बिरहारे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात घ्यावयाची काळजी व एड्स रोग्यांबद्दल मदतीची व त्यांना आधाराची गरज या विषयी माहिती सांगितली
यावेळी विनोद मगरे महेश बहाळकर, पद्माकर वाघ्रुळकर याची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश अंभुरे व प्रास्ताविक सुधाकर येवतिकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार गणेश चव्हाण यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.