तिर्थपुरी येथील दरोडा प्रकरणी दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जालना प्रतिनिधी
तीर्थपुरी येथे दि. १८ नोहेबर रोजी पहाटे पवार बंधूंच्या घरावर दरोडा पडला होता. यात तब्बल ३५ तोळे सोने लुटण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
दि. १८ नोव्हेंबर रोजी तीर्थपुरी येथील खिडकीचा मळा या ठिकाणी वास्तव्यास असलेले उल्हासराव पवार व त्यांचे बंधू सुरेश पवार हे घरात झोपलेले असताना पहाटे दोन ते अडीच च्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यात पवार यांचे तब्बल ३५ तोळे सोने पळविण्यात आले होते.दरोड्यानंतर जिल्हा अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले होते. शानपथक अंगुलीमुद्रा पथकाद्वारे तपास करण्यात आला. एलसिबीने दोन-तीन वेळा घटनास्थळाची पाहणी करून माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तीन पथके स्थापन करून आरोपींचा शोध घेण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार केवळ दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे . सदर्भित संशयित आरोपी पिठोरी शिरसगाव येथील असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे .