तर अतिवृष्टीचे अनुदान खात्यामध्ये जमा होणार नाहीत : घनसावंगी तहसीलदार यांची माहिती

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान मिळवण्यासाठी नवीन पद्धतीने याद्या देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्डसह बँक खाते व इतर कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
घनसावंगी तालुक्यात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना शासनाकडून नियमानुसार अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी सन २०२२-२३ शासनाच्या नवीन निकषानुसार यादीमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक टाकून याद्या इंग्रजीमध्ये देणे सक्तीचे आहे. सर्वांनी दोन दिवसाच्या आत आपल्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत त्यावर आपला मोबाईल क्रमांक, गट क्रमांक व गावाचे नाव टाकून तलाठी कार्यालयात दाखल करावा तसेच
कोणाचे बँक खाते क्रमांक द्यावयाचे बाकी असतील त्यांनीही ते आयएफसी कोडसह दाखल करावेत, जेणेकरून अनुदान यादी तयार करणे सोईचे होईल शासनाच्या नविन निकषानुसार आधार कार्ड क्रमांक व आधारकार्ड नुसार नाव असणे व मोबाईल क्रमांक टाकणे सक्तीचे असल्याने याच्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करता येणार नाही, तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत त्यावर पेनाने आपला मोबाईल क्रमांक गट क्रमांक व गावाचे नाव टाकून तलाठी कार्यालयात दाखल करावा, जे शेतकऱ्यांकडून दाखल करण्यात येणार नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार नाहीत व याची जबाबदारी ही त्यांची असेल याची कृपया नोंद घ्यावी, असे प्रभारी तहसीलदार संदीप मोरे यांनी केले आहे