ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाबद्दल पञकारांचा सत्कार
दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अशोक साकळकर व भारत सवणे या दोन पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी यथोचित सत्कार करण्यात आला.
परतूर तालुक्यातील मापेगाव (बु.) ग्रामपंचायतच्या सदस्यपदी पत्रकार अशोक साकळकर तर दैठणा(खुर्द) ग्रामपंचायतच्या सदस्यपदी पत्रकार भारत सवणे भरघोस मते मिळवून विजयी झाले आहेत. दोघेही परतूर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने अशोकराव साकळकर व भारत सवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी ढोबळे, पत्रकार आशिष गारकर, अर्जुन पाडेवार, सचिव दीपक हिवाळे, रामप्रसाद नवल, आशिष धुमाळ, अजय देसाई, राजकुमार भारुका, सागर काजळे, सरफराज नाईकवाडी, आदींची उपस्थिती होती.