जालना जिल्हा

जालना मोतीबाग जवळ दुचाकीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली


जालन्यात मोतीबागेजवळ घडली घटना
जालना:

images (60)
images (60)

दरेगाव येथील पती-पत्नी हे मोटारसायकलवरून औरंगाबाद चौफुलीकडून मोतीबाग मार्गे गावाकडे परतत होते. या दाम्पत्याची मोटारसायकल मोतीबागजवळील तळ्याजवळ येताच पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवरील दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. हे चोरटे मोतीबागेकडून कचेरीरोडने जालना शहरात सुसाट वेगाने पसार झाले. महिलेच्या पतीने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र, ते सापडले नाही. घटनास्थळी चंदनझिरा आणि कदीम जालना पोलिसांनी तातडीने भेट दिली. महिलेची तक्रार घेण्याचे काम कदीम जालना पोलीस ठाण्यात सुरू असून, सोन्याची पोत किती रक्कमेची आहे, हे तक्रार दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होईल. दोन दिवसांपूर्वीही भरदिवसा अंबड चौफुली परिसरात असाच प्रकार भामट्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता..

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!