डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित’अंकुर मानवतेचा’बालनाट्याने जिंकली प्रेक्षकांची मने
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत
हरिदास घुंगासे लिखित आणि
प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित”अंकुर मानवतेचा” या बालनाट्याचे यशस्वी सादरीकरण झाले.ग्रामीण भागातील बालकलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत.या प्रयोगासाठी
निर्मिती सहाय्य रघु ताठे,किसन भोईटे, महेंद्र वाहुळे,सुनिल जयराम बर्डे,नंदू वाघमारे,संतोष गौतम ,किशोर साबळे,यांनी केले आहे.
श्री.सुंदरेश्वर बहु. उद्देशीय से. संस्था,(गुंज )द्वारा आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस्,
पिंपळगाव(कुं),घनसावंगी,जिल्हा. जालना येथील बालकलावंत
तापडिया नाट्यमंदिर औरंगाबाद,
दि.2 जानेवारी रोजी सादर केला. प्रेक्षकांनी या बालनाट्याचा आस्वाद घेतला. अकॅडमीचे संचालक लेखक हरिदास घुंगासे या मध्ये अमृता देवकर, एकता गणकवार,आराध्या तौर, कैवल्य कंटूले, राजवीर पवार, संचित बनसोडे, विराज दायमा ,करण पवार, ईश्वरी ताठे, आयुष घुंगासे, युवराज भोईटे,आदी विद्यार्थांनी या मध्ये सहभाग घेतला आहे. या बालनाट्यास विख्यात सिने लेखक दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांचे मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्रामीण भागातील बालकलावंतांना राज्य बालनाट्य स्पर्धेत संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल पालकांनी व गावकऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आभिनंदन केले आहे.सामाजिक विषमता मिटली पाहिजे.समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुता या समवेत मानवतेचंही मूल्य रुजविले पाहिजे या भूमिकेतून सदरील बालनाट्य डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित केले आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतांना आजही गरीब शिक्षणा पासून वंचित राहतात. त्यांना कोणताही आधार नसतो मग अशा मुलांच्या शिक्षणासाठी व उदरनिर्वाह साठी दानपेटीतील रक्कम, चैन मौज खर्च कमी करून तोच पैसा गरजवंतासाठी उपयोगात आणला पाहिजे. हे सामाजिक भान लहान मुलांना यावे यासाठी हा प्रयत्न केला आहे.मानवतेचा अंकुर रुजविण्यासाठी चला एक पाऊल उचलूया असा सामाजिक संदेश प्रस्तुत बालनाट्यातुन दिला आहे.