घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ महसूल मंडळाचा अतिवृष्टीच्या अनुदानात समावेश करा-अनिरूद्ध शिंदे

गटनेते अनिरूद्ध शिंदे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ महसूल मंडळ सन २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळण्यात आलेले आहे.या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मात्र हे दोन्ही महसूल मंडळ अनुदानातून वगळल्याने संबंधित शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. वंचित शेतकऱ्यांचा अतिवृष्टीच्या अनुदानात समावेश करण्याची मागणी गटनेते अनिरुद्ध शिंदे यांनी बुधवारी (ता.एक) घनसावंगीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन २०२२ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
सरकारने या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले आहे परंतु तालुक्यातील जांबसमर्थ व कुंभार पिंपळगाव या दोन मंडळांना या अतिवृष्टी ग्रस्त मंडळाच्या यादीतुन वगळल्याने या दोन मंडळांतील जांबसमर्थ, विरेगाव, विरेगाव तांडा, हातडी, बेलवाडी, घोन्सी बु, घोन्सी तांडा १ व २, कोठाळा, घानेगाव, भेंडाळा, भेंडाळा तांडा, गुणानाईक तांडा, साकळगाव, श्रीपत धामनगाव, लिंबी, सिंदखेड, देवी दहेगाव,
तसेच कुंभार पिंपळगाव मंडळातील कुंभार पिंपळगाव, लिंबोणी, अरगडे गव्हाण, पाडुळी, मुर्ती, उक्कडगाव, शिवणगाव, राजुरकर कोठा, नागोबाची वाडी, राजाटाकळी, गुंज बु, भादली या गावातील शेतकरयांना अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रत्यक्षात संपुर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना या दोन मंडळातील शेतकरयांवर एक प्रकारे हा अन्याय होत असल्याचे दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित गावातील शेतकरयांना अतिवृष्टी अनुदानाचा लाभ द्यावा नसता संबंधित गावातील शेतकरयांना घेऊन शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!