श्री सरस्वती भुवन प्रशालेत स्नेहसंमेलन उत्साहात
कुंभार पिंपळगाव : विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थित रसिकांची मने
कुंभार पिंपळगाव:कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (ता.दहा) मोठ्या उत्साहात पार पडले.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन समृद्धी शुगर्स कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच संगिता लोंढे,गंगाधर लोंढे,उपसरपंच आबासाहेब राऊत,शालेय समिती सदस्य अंशिराम कंटुले, भरत कंटुले,बालासाहेब कंटुले, देविदास मिसाळ,शिवाजीराव कंटुले,संजय तौर,प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे,उपमुख्याध्यापक सुभाष देठे यांची उपस्थिती होती.मान्यवरांनी प्रभारी पर्यवेक्षक व जेष्ठ क्रिडाशिक्षक चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम पथकाने व आरएसपीच्या पायलट यांनी मानवंदना दिली.यावेळी सतिष घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी प्रास्ताविक केले.प्रशालेचे उपमुख्याध्यापक यांच्या संकल्पनेतून साकारून अत्यंत यशस्वी झालेल्या व सर्वत्र गौरव झालेल्या दिवाळी सुट्टीतील अवांतर वाचन उपक्रमात सहभागी होऊन यश प्राप्त केलेल्या दिव्या अरगडे,आदिती कंटुले
समृद्धी देशमुख या विद्यार्थ्यांचा व खुशाल पवार,शिवप्रसाद काळे,रत्नाकर लांडगे, या शिक्षकांचा तसेच घनसावंगी येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांचा व प्रशालेने बनविलेला व संमेलनात गौरविलेल्या मराठवाडा स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा स्मृतीस्तंभ बनविलेल्या विद्यार्थी व शिक्षक संतोष सवडे,यांचा सुधाकर येवतीकर,महेश बहाळकर,रमेश देवनूरे यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि नाटकाचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांचे मने जिंकली.यानिमित्त झालेल्या स्नेहसंमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थींनीे कु.किर्ती ठाकूर हिने केले. तर उपमुख्याध्यापक सुभाष देठे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.