शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्याची कार्यवाही थांबवा.
घनसावंगीचा शेती वीज पुरवठा पूर्ववत न केल्यास आंदोलन.
जालना : विविध संकटांमुळे वीजबिल भरणा करू शकत नसल्याने वीज वितरण विभागाने शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन बंद करणे तसेच थेट डीपी मधून पुरवठा बंद करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. हि कार्यवाही अन्यायकारक असून ती त्वरित थांबवावी यासाठी घनसांवगी तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे
कोरोनाकाळात देशाची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांवर संकटकाळी अशा पद्धतीची कार्यवाही करणे हे मानवतेला धरून नाही. शेतकऱ्यांवर झालेल्या कार्यवाहीचा परिणाम हा केवळ व्यक्तिगत नसून पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होतो. अन्नधान्य हि मूलभूत गरज असून त्याचा पुरवठा केवळ शेतकरी करतो. लॉक डाऊन च्या काळात जेव्हा संपूर्ण देश ठप्प झाला होता तेव्हा केवळ शेतकरी राबत होता. त्याच्या योगदानामुळेच अर्थव्यवस्था तग धरून आहे. शेतकऱ्याला अशा पद्धतीने उध्वस्त केल्या जात असेल तर याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र व पर्यायाने देशावर होतील.
त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ ग्राहक म्हणून न पाहता त्याच्या योगदानाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे . 2013 चा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लोकांना जीवन जगण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार अन्न पुरेशा प्रमाणात मिळण्याची खात्री करून, मानवी जीवन चक्राच्या दृष्टीकोनातून अन्न आणि पौष्टिक सुरक्षा प्रदान करण्याची हमी देतो. हि कार्यवाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या कलम 31 आणि अनुसूची III चे उल्लंघन करणारी आहे .
शेतकरी न्याय हक्कासाठी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने न्यायालयीन व रस्त्यावर लढा दिला आहे.या प्रसंगीही घनसांवगी तालुका काँग्रेस कमिटी शेतकऱ्यांच्या सोबत आहे तहसीलदार यांना यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करावा अशी विनंती खरात यांनी केली आहे.
वीज व पाणी हि शेतीची प्राथमिक गरज आहे. ते बंद केल्यास शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो. शेतकऱ्याने कर्ज काढून व प्रचंड मेहनतीने उभे केलेले पीक मातीमोल होण्याची शक्यता असते. त्यामुळे हि सक्तीची कार्यवाही वीज वितरण कंपनीने करू नये अशी मागणी रामप्रसाद खरात यांनी केली आहे. तालुक्यातील कृषी पंपाचा थकीत वीज बिलासाठी खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा व वीज तोडणी मोहीम तात्काळ बंद करावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.