रांजणी ग्रामपंचायतमध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

रांजणी/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अमोलभाऊ देशमुख यांनी सांगितले की संत सेवालाल महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमास सरपंच अमोलभाऊ देशमुख, माजी सरपंच राधाकिसन जाधव, ग्रामपंचायत सदस्य दीपक वरखडे, दगडू भालेकर, इरफान कुरेशी, इरफान शाह, सुदाम पवार, शिवाजी पाटोळे, कैलास वरखडे, केशव जाधव, असलम बागवान, भगवानसिंह जनकवार, धनंजय देशमुख, प्रेम राठोड, सुनील पवार, मनिराम चव्हाण, लालचंद चव्हाण, शाम चव्हाण, सचिन राठोड, रणजित राठोड, किशोर राठोड, गणेश चव्हाण, विलास चव्हाण, दत्तू राठोड, अजबसिंह ठाकूर, रामदास साळवे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले तर कैलास जाधव यांनी आभार मानले.