घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

नाथषष्ठीसाठी पैठणला जाणाऱ्या पायी दिंडीचे विरेगव्हाण तांड्यात उत्साहात स्वागत

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे नाथषष्ठीसाठी श्रीक्षेत्र पैठणकडे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचे बुधवारी (ता.८) उत्साहात स्वागत करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विनापूजन, ध्वजपूजन करून सर्व भाविकांचे औक्षण करण्यात आले.दिंडी सोहळ्यातील भाविकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी हरीभाऊ पवार, जालिंदर पवार, भाऊसाहेब महाराज राठोड, सुरेश राठोड, सोपान राठोड, अंगद राठोड, विनोद पवार, कुलदीप पवार, गोरख पवार यांच्यासह आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यातील रेणाखळी येथील भाविकांचा पायी दिंडी सोहळा विरेगव्हाण तांडा येथे दरवर्षी विसावा असतो.यानिमित्ताने दिंडी सोहळ्यात पुरूष व महिलांचा स्वागत करून चहापानासह त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या पायी दिंडीचे हे दुसरे वर्षे असून वाहेगाव, विरेगव्हाण, खडका,रामसगाव, कुंडलिकनगर, पाथरवाला, साष्टपिंपळगाव मार्गे दि.१२ रोजी पैठणला पोहोचणार असल्याचे दिंडीचालक रावसाहेब महाराज इंगळे यांनी सांगितले. या दिंडीत हरीभाऊ महाराज हारकळ, अशोक हारकळ, विणेकरी अंकुश हारकळ, कुंडलीक हारकळ, भगवान हारकळ, तुकाराम हारकळ यांच्यासह सत्तर भाविकांचा समावेश आहे. दिंडीत ठिकठिकाणी भजन,किर्तन, जागर आदी कार्यक्रम होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!