घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

ग्रामपंचायत शिवणगाव : जागतिक महिलादिनानिमित्त बालविवाह निर्मूलनासाठी घेतली शपथ.

शिवणगाव : ग्रामपंचायत व अंगणवाडी क्र.२ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन बालविवाह निर्मूलन या विषयी शपथ घेऊन साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ. शकुंतला विजयकुमार तौर व उपसरपंच पद्माबाई तौर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा महान व्यक्तींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दरम्यान स्त्री-भ्रून हत्या,बालविवाह निर्मूलन या विषयावर जनजागृती करून शपथ घेण्यात आली.
यावेळी सरपंच सौ.शकुंतला तौर,उपसरपंच पद्माबाई तौर,अंगणवाडी सेविका शोभा तौर,नलिनी तौर,रंगुबाई पाटोळे,संध्या तौर,शिवानी तौर,भक्ती तौर,संगणक परिचालक नितीन तौर,शिपाई लहू मोरे,पा पू सेवक गोविंद तौर,उमेश तौर व गावातील महिला,पुरुष आणि किशोरी मुली उपस्थित होत्या …..

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!