जालना जिल्हा

पालिकेच्या त्या खुलाश्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी

images (60)
images (60)


परतूर – प्रतिनिधी
नगर पालिकेने महाराजा अग्रसेन चौक सुशोभिकरण कामाबाबत करण्यात आलेल्या रु. १० लक्षच्या अपहारा बाबत खुलासा दि ५ मार्च २०२३ रोजी काढला आहे. त्या खुलाश्याची चौकशी करण्याची मागणी परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर पालिकेने महाराजा अग्रसेन चौक सुशोभिकरण कामाबाबत करण्यात आलेल्या रु. १० लक्षच्या अपहारा बाबत खुलासा दि ५ मार्च २०२३ रोजी काढला आहे दि ५ मार्च २०२३ रोजी काढलेला खुलासा या दिवशी रविवार  सुट्टीचा दिवस आहे. आणि तसेच सदरील खुलाश्यावर नगर पालिकेचा शिक्का मारलेला नाही. नगरपालिका मुख्याधिकारी यांनी काढलेल्या खुलाश्यावर पालिका मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी आहे. ती स्वाक्षरी खरी आहे का खोटी. तसेच खुलासा काढण्यासाठी नगर पालिका रविवारी सुरू असते का ? नगर पालिका मुख्याधिकारी यांनी कोणात्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दबावाखाली पत्र काढून खुलासा काढला. आणि हे खुलाश्याचे पत्र सोशलमीडियावर व्हायरल कोणी केले. तसेच नगर पालिकेने पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्या एवजी कोणाच्या माध्यमातून खुलाशाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. या सर्व प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करून आठ दिवसात दोषीवर कडक कारवाई करावी. नसता पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर अजय देसाई, आशीष गारकर, सागर काजळे, भारत सवने, सुरेश कवडे, प्रभाकर प्रधान, प्रमोद बिल्हारे, कैलास चव्हाण, सुरेश काळे, माणिक जैस्वाल, संजय देशमाने, तारेख शेख, मुमताज अंसारी, सय्यद वाजेद आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!