जुनी पेन्शन संप : आमच्या भविष्याची सांगा कोण घेणार हमी म्हणत NPS ग्रस्त शिक्षकाच्या मुलीने गायिले गीत!
घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर
राज्यव्यापी संप 14 मार्चपासून सुरु आहे या संपात तलाठी संघटनेचे अध्यक्ष, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष,आरोग्य संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष याच्या उपथितीसह पाठिंबा आहे.
या संपात एका NPS ग्रस्त शिक्षकाच्या मुलीने अजिन आसिफ शेख हिने पेंशन गीत गाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत.
घनसावंगी तालुक्यातील शासकीय – निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठीचा राज्यस्तरीय संप पाचव्या दिवशीही सुरूच आहे . सर्व शासकीय कार्यालये , आरोग्य विभागाचे काम ठप्प होऊनही याबाबत अद्याप शासनाची डोळेझाकपणाची भूमिका असल्याने संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी शुक्रवारी घनसावंगी येथील तहसील कार्यालयासमोर घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला . जुनी पेन्शन योजना लागू करा , पीएफआरडीए कायदा रद्द करा , कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा , सर्व विभागांतील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्या , अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता द्या , चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा , शिक्षक – शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा , कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करा , अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.
संपकऱ्यांनी मागण्या बाबत घोषणा देऊन काढला मोर्चा