आजपासून विरेगव्हाण तांडा येथे अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे ह.भ.प.वै.वासुदेव महाराज राठोड यांच्या आर्शिवादाने ता.१० ते १७ एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या आयोजित हरीनाम सप्ताहात ह.भ.प.राजेंद्र महाराज सरवदे,ह.भ.प.पांडुरंग महाराज आनंद,ह.भ.प.बापुराव महाराज चारठाणकर,ह.भ.प.निलमताई महाराज पवार श्रीक्षेत्र आळंदी देवाची,ह.भ.प.लक्ष्मण महाराज साबळे, ह.भ.प.गितांजलीताई महाराज गाढेकर,ह.भ.प.विष्णू महाराज आनंदे यांचे हरीकिर्तन होणार आहे.तर सोमवारी(ता.१७) रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प.रामायणार्य सतिष महाराज शास्री बोररांजणीकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सात दिवसीय हरीनाम सप्ताहात दैनंदिन पहाटे काकडा आरती,विष्णू सहस्त्रनाम,गाथा पारायण,रामायण,हरीपाठ,हरीकिर्तन,जागरण असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.तर ह.भ.प.विश्वनाथ महाराज पवार हे रामकथेचे वाचन करणार आहेत.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आयोजित किर्तन श्रवण व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी व नवतरूण युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.