घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
रेणुका देवी यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अनिरुद्ध शिंदे

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील जागृत देवस्थान असलेले रेणुका देवी यात्रोत्सवास शुक्रवारी (ता.१४) पासून सुरुवात झाली आहे.दरवर्षी येथे चैत्र पौर्णिमेला सात दिवस मोठी यात्रा भरत असते.जिल्हाभरासह महाष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.(ता.१३) रोजी बोडखा (ता.घनसावंगी) येथून रात्री देवीचे पातळ आणले जाते. (ता.१५) रोजी पालखी, (ता.१७) रोजी मांडव तळणी भंडारा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.तर (ता.२०) रोजी यात्रेची सांगता होणार आहे.भाविकांनी यात्रेत सहभाग घेऊन दर्शनासाठी अवश्य येण्याचे आवाहन शिवसेना गटनेते अनिरूद्ध शिंदे यांनी केले आहे.