देवाकडे जाण्यासाठी पाच गोष्टींचा त्याग करावा लागतो-गितांजली म. गाढेकर

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
देवाकडे जाण्यासाठी पाच गोष्टींचा त्याग करावा लागतो.या पाच गोष्टींचा त्याग केला तरच संत मृत्यू शेवटच्या अंती साथ देत असल्याचे मत ह.भ.प.गितांजली ताई गाढेकर यांनी घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात शनिवारी (ता.१५) सहावे पुष्प गुंफताना व्यक्त केल्या.
माझा विठोबाचा कैसा प्रेमभाव | आपणची देव होय गुरू ||
पडियें देहभावे पुरवी वासना | अंती ते आपणापाशीं न्यावे ||
दसंत तुकाराम महाराज यांच्या चार चरणांच्या अभंगावर निरूपण करताना ह.भ.प.गाढेकर म्हणाल्या की,माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू? तो देव रूपाने कृपा करतो व गुरुच देव आहे. भक्तासाठी देह धरण करून त्यांची इच्छा पुरवितो.आणि शेवटी आपणा जवळ घेऊन जातो.तो भक्तांच्या मागेपुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो.भक्तांच्या संकटाचे निवारण करतो.भक्तांचे संकट जाणून त्यांचे योग क्षेम निवारण करतो.आणि भक्तांच्या हाताला धरून भक्ती मार्गाची वाट दाखवितो.ज्यांचा देवांवर विश्वास नाही त्यांनी पुराणातील उदाहरण पाहावेत असे शेवटी त्यांनी सांगितल्या. यावेळी ग्रामस्थासह पंचक्रोशीतील गायक, वादक,भजनी मंडळ, महिला, नवयुवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.