घनसावंगी तालुकाजालना जिल्हामहाराष्ट्र

मूर्ती गावातील लोकसहभाग ऋणनिर्देश सोहळा भव्यतेने पार पडला!


कुंभार पिंपळगाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती (केंद्र गुंज बु., ता. घनसावंगी, जि. जालना) येथे मागील पाच महिन्यांत शाळेला सढळ हाताने शैक्षणिक मदत करणाऱ्या लोकांसाठी आयोजित ‘लोकसहभाग ऋणनिर्देश सोहळा’ मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी आनंदात पार पडला. या कार्यक्रमात एकूण चार लाख ९२ हजार ३४५ रुपयांची मोठी रक्कम शाळेच्या विकासासाठी खर्च झाल्याने गावकऱ्यांचा उत्साह दांडगा होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी, कृषी रत्न विजय अण्णा बोराडे, शिक्षण विस्तार अधिकारी सोळंके , ए. के.राखुंडे , पीएसआय आदीनाथ ढाकणे ,मुख्याध्यापक राजू तौर उपस्थित होते. प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आदर्श मुख्याध्यापक वायाळ , केंद्रप्रमुख सुनील खोडदे , प्रमोद येडले , कोटा पॅटर्न परिवारातील प्रदीप देशमुख व टिम, सरपंच भागवत अण्णा सोळंके, तंटामुक्ती अध्यक्ष गीताराम सोळंके, ग्राम विकास अधिकारी डी बी गणकवार , चेअरमन बळीराम सोळंके, लक्ष्मण बेवले , माकणीकर , तुकाराम सूर्यवंशी , नितीन लोहट , घाटूळ , सुभाष चिंचाणे , रघुनाथ शिंदे, संतोष सोळंके, ढवळे भाऊसाहेब, मोहनराव सोळंके, माजी सरपंच कैलास दादा सोळंके, रामराव सोळंके, हनुमान शिंदे, उपसरपंच महादेव देवकर, प्रल्हाद बोराडे, भागवतराव काळे, डॉ. मोहनराव सोळंके, संतोष सोळंके, रामेश्वर जैद यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय मूर्ती, गुंज व कुंभार पिंपळगाव केंद्रातील सर्व माजी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रसंगी पंकज बिरादार व प्रवीण भस्के यांनी सुबक रांगोळी आखून वातावरणाला आकर्षक बनवले. आदर्श मुख्याध्यापक राजू तौर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाने मूर्ती गावातील लोकसहभागाचा आदर्श सर्वदूर पसरला. अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले असून, हा सोहळा शाळेच्या विकासासाठी मीलाचा दगड ठरला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!