जालना:जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ही 8 हजार 288 व्यक्तींच्या अँटीजेन चाचणी
जालना दि. 21 (न्यूज जालना) :-
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले असुन दि. 22 मे 2021 रोजी करण्यात आलेल्या अँटीजेन तपासणीची माहिती खालीलप्रमाणे आहे. जालना शहरात एकुण 1 हजार 212 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 8 पॉझिटिव्ह व 1 हजार 204 निगेटिव्ह आले आहेत. जालना ग्रामीण येथे एकुण 440 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 3 पॉझिटिव्ह व 437 निगेटिव्ह आले आहेत. बदनापुर येथे एकुण 399 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह व 395 निगेटिव्ह आले आहेत. अंबड येथे एकुण 1 हजार 122 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 45 पॉझिटिव्ह व 1 हजार 77 निगेटिव्ह आले आहेत. घनसावंगी येथे एकुण 1 हजार 113 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 41 पॉझिटिव्ह व 1 हजार 72 निगेटिव्हआले आहेत. भोकरदन येथे एकुण 1 हजार 479 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 21 पॉझिटिव्ह व 1 हजार 458निगेटिव्ह आले आहेत. जाफ्राबाद येथे एकुण 1 हजार 100 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 23 पॉझिटिव्ह व 1 हजार 77 निगेटिव्ह आले आहेत.परतुर येथे एकुण 1 हजार तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 24 पॉझिटिव्ह व 976 निगेटिव्ह आले आहेत. मंठा येथे एकुण 406 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 10 पॉझिटिव्ह व 396 निगेटिव्ह आले आहेत. अशा प्रकारे एकुण जिल्ह्यात दि. 22 मे 2021 रोजी 8 हजार 288 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 180 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 8 हजार 108 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वत:साठी व कुटुंबियांसाठी कोरोना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ॲटिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर केले