Breaking News
घनसावंगी तालुका

रमजान महिन्यातही सोशल डिस्टन्सचे पालन करा-पोलीस निरीक्षक बंटेवाड


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. तसेच प्रशासनाने सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन केले असून रमजान महिन्यातही सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी केले आहे.
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर रांजणी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड म्हणाले की सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलेले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. हा लाॅकडाऊन आपल्या सर्वांच्या भल्यासाठी असून रमजान महिन्यातही लाॅकडाऊन व सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करण्यात यावे. यावेळी सरपंच राधाकिसन जाधव, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल खालेक कुरेशी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल देशमुख, धनंजय देशमुख, शेख सिद्दीक, शफिक अतार, भारत देवकर, मसरत तांबोळी, नितीन वरखडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक