देशविदेश

अंबड तालुक्यातील दुसरी घटना :विहीरीत तोल जाऊन एकाचा मृत्यु


जामखेड:- अंबड तालुक्यातील किनगाव येथील युवक कृष्णा भाऊसाहेब तारडे वय-35 वर्ष हा वार शुक्रवार रोजी दुपारी 12 च्या सुमारास जनावरांचा विहरीतुन पाणी सेदुन पाजत असतांना विहीरीत तोल गेल्याने कृष्णा तार्डे याचा विहीरीत पडून मृत्यू झाला.सदरील मयत कृष्णा तार्डे हा युवकांचा शेती व दुग्धव्यवसाय असल्याने त्यांचे आठ ते नऊ जनावरांना आहे.तसेच सदर विहीरीवर काही वेळाने जनावरांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या दिनेश दिवटे यांच्या प्रथम निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी गावातील लोकांना फोनवरून संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.
गावातील लोकांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन कृष्णा तार्डे यास विहरीतुन बाहेर काढून उपाचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.तसेच मयत व्यक्ती हा कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई,वडील, भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे.
सदर घटनेमुळे गावासह परिसरात नागरिकतुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक