Breaking News
घनसावंगी तालुका

रांजणी रेल्वे स्टेशन पडले ओस


रांजणी न्युज/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील रेल्वे स्टेशन रेल्वे गाड्या अभावी ओस पडले असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. स्टेशनवर आता रेल्वे कधी धावणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.


रांजणी परिसरातील जवळपास 35 गावांचा संपर्क रांजणीशी जोडलेला असून परिसरातील प्रत्येक गावातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी रांजणीला यावे लागत आहे. तसेच या 35 गावातील नागरिकांना कोणत्याही शहराला जायचे असल्यास त्यांना रांजणी रेल्वे स्टेशनवरुनच जावे लागते. रांजणी रेल्वे स्टेशनवरुन दररोज 10 ते 12 गाड्या धावतात. त्यामुळे या स्टेशनवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. परंतु सध्या कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. तसेच संपूर्ण रेल्वे गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरातच बसून आहेत. लाॅकडाऊनमुळे सर्व रेल्वे गाड्या बंद असल्याने रांजणी रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट पसरलेला आहे. काही दिवसापूर्वी या स्टेशनवरुन एक किंवा दोन मालगाडया धावत होत्या. परंतु या स्टेशनवर सध्या कोणत्याच रेल्वे गाड्या येत नसल्याने स्टेशन ओस पडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक